कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ’नांदेड’ संस्थेची पार्श्वभूमी
लाल बहाद्दूर शास्त्री छात्रालय (मुलांचे वसतीगृह)
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका या विचाराचा वारसा पुडे घेऊन जाण्याच्या हेतूने संस्थेने मुलांचे वस्तीगृह हे दुसरे युनिट 1991 साली सुरू केले. या युनीटला महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून 24 विध्यार्थ्यांची शासन मान्यता सन 1992-93 साली अनुदान तत्वावर मिळालेली आहे. सदर संस्थेच्या मदतेतून आजतागायत 800 गरजू विध्यार्थ्यानी लाभ घेतलेला आहे . आजही हे युनिट अतिशय सक्षमतेने काम करत गरजू मुलांना घडवते आहे.